
होळीचा उत्सव (Holi 2021) हा रंगांचा आणि धमाल सण आहे. प्रत्येकजण या दिवशी रंगांमध्ये मग्न होताना दिसतो. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना होळी खेळणे अजिबात आवडत नाही. पडद्यावर होळीची धूम करणारे हे कलाकार प्रत्यक्षात मात्र रंगांपासून चार हात दूर राहतात. त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे होळी खेळणे आवडत नाहीत.

होळी न खेळणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. जॉनला होळी खेळणे अजिबात आवडत नाही. जॉन म्हणतो की, होळीच्या निमित्ताने लोक केमिकलयुक्त रंग वापरतात, त्यामुळे त्वचा खराब होते

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा ‘83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटासाठी रणवीरनं 50 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

या यादीमध्ये रणवीर सिंगचे नावदेखील समाविष्ट आहे. रणवीरने ‘लहू मु लग गया’ गाण्यावर धामाल होळीही खेळली आहे. पण त्याला प्रत्यक्षात रंगांनी खेळणे अजिबात आवडत नाही. रणवीरच्या म्हणण्यानुसार, पर्यावरणासाठी हे रंग हानिकारक आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या पालकांमुळे होळी खेळत नाही. वास्तविक, तापसीचे पालक कधीच होळी खेळत नाहीत, अशा परिस्थितीत तापसीनेही कधी होळी खेळली नाही आणि ती बहुतेकदा या सणाच्या दिवशी कामात व्यस्त असते.

असे म्हटले जाते की, आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करीना कपूर-खानने होळी खेळणे सोडले आहे. राज कपूर हयात होते तेव्हा, दरवर्षी एक शानदार होळी पार्टी आयोजित केली जायची.

टायगरबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच हीरोपंती 2 मध्ये दिसणार आहे.

श्रुती हासनला पाण्याने होळी खेळणे अजिबात आवडत नाही. म्हणून ती होळी खेळणेच टाळते.