‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म

'होणार सून मी या घरची' या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेत्री रोहन गुजरच्या आयुष्यात दोन चिमुकल्यांचं आगमन झालं आहेत. रोहनची पत्नी स्नेहलने जुळ्यांना जन्म दिला आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 12:03 PM
1 / 5
'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारलेला अभिनेता रोहन गुजर खऱ्या आयुष्यात जुळ्या मुलांचा पिता बनला आहे. रोहनची पत्नी स्नेहल देशमुखने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. रोहनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारलेला अभिनेता रोहन गुजर खऱ्या आयुष्यात जुळ्या मुलांचा पिता बनला आहे. रोहनची पत्नी स्नेहल देशमुखने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. रोहनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

2 / 5

'तीन महिने, दोन आत्मा आणि एक कुटुंब..', असं कॅप्शन लिहित रोहनने चिमुकल्यांच्या हातांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. आद्या स्नेहल रोहन गुजर आणि अद्वय स्नेहल रोहन गुजर अशी त्यांची नावं आहेत.

3 / 5

रोहनच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोहन आणि स्नेहल यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत.

4 / 5

रोहनने 'होणार सून मी या घरची', 'लव्ह लग्न लोचा', 'बन मस्का' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु 'होणार सून मी या घरची' या मालिकेतल्या पिंट्या या भूमिकेच्या नावानेच तो सर्वाधिक ओळखला जातो. सध्या तो 'आमने सामने' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

5 / 5

पल्लवी पाटील, स्वरदा ठिगळे, अभिजीत केळकर, नंदिता पाटकर यांसारख्या कलाकारांनी रोहनच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्नेहलसाठी आई होण्यापर्यंतचा काळ काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी तिने गंभीर आजाराचा सामना केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us