
अभिनेत्री निधी अग्रवालने 'मुन्ना मायकल'मधून बॉलिवुड पदार्पण केलं. या चित्रपटात निधीसोबत टायगर श्रॉफ लीड रोलमध्ये होता. या चित्रपटानंतर देशभरात निधीच्या सौंदर्याचे चाहते तयार झाले.

सोशल मीडियावर निधीचे फोटो चांगलेच चर्चेत असतात. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्याची मनं जिंकून घेतो.

बॉलिवूडमधील पहिला चित्रपट अपयशी ठरल्यानंतर निधीने 'सव्यसाची' या चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं. इथं मात्र तिची जादु चालली.

यानंतर निधीने मिस्टर मजनू आणि इस्मार्ट शंकर सारखे चित्रपट केले. यानंतर निधीच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली.

विशेष म्हणजे निधी मिस इंडिया पीजेंटच्या मिस दीवा 2014 मध्ये फायनलिस्ट राहिलेली आहे.

टॉलिवुडमध्ये निधीचा जलवा दिसल्यानंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केलेलं नाही.

दक्षिणेकडे मिळालेल्या प्रेमाने ती खूप आनंदी आहे आणि आता टॉलिवूडवरच लक्ष्य देण्याचा तिचा विचार दिसतोय.

टॉलिवुडमध्ये निधीचे चाहते इतके वेडे झालेत की काहींनी निधीचं एक मंदिर बांधून त्यात तिची मुर्ती स्थापनाही केली होती.

निधी आपली व्यक्तिगत माहिती माध्यमांपासून दूर ठेवते. तिला आपल्या खासगी आयुष्यावर कुणी बोलावं असं वाटत नाही.

निधीच्या मते ती अद्याप सिंगल आहे. आपल्या आयुष्यात फोन करुन किंवा मेसेज करुन बोलावं असं कुणीच नाही याचं तिला दुःख असल्याचंही ती सांगते.