Knowledge : बिर्याणी खाद्यपदार्थ तयार कसा झाला? रंजक गोष्ट माहिती आहे का?

त्यामुळे बिर्याणी कशी अस्तित्त्वात आली, ते जाणून घेऊ या. बिर्याणी हा शब्द फारशी शब्द बिरियन या शब्दापासून तयार झाल्याचे मानले जाते. बिरियन या शब्दाचा अर्थ शिजवण्याच्या अगोदर तळलेला पदार्थ. फारशी भाषेतच बिरिंज असा एक शब्द आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 12:31 AM
1 / 5
बिर्याणी हा भारतात सर्वाधिक आवडणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. आज भारतात बिर्याणीचे  अनेक प्रकार आहेत. लोक आवडीने बिर्याणी खातात. परंतु खूपच कमी लोकांना बिर्याणीची निर्मिती कशी झाली? याची माहिती आहे.

2 / 5
त्यामुळे बिर्याणी कशी अस्तित्त्वात आली, ते जाणून घेऊ या. बिर्याणी हा शब्द फारशी शब्द बिरियन या शब्दापासून तयार झाल्याचे मानले जाते. बिरियन या शब्दाचा अर्थ शिजवण्याच्या अगोदर तळलेला पदार्थ. फारशी भाषेतच बिरिंज असा एक शब्द आहे.

त्यामुळे बिर्याणी कशी अस्तित्त्वात आली, ते जाणून घेऊ या. बिर्याणी हा शब्द फारशी शब्द बिरियन या शब्दापासून तयार झाल्याचे मानले जाते. बिरियन या शब्दाचा अर्थ शिजवण्याच्या अगोदर तळलेला पदार्थ. फारशी भाषेतच बिरिंज असा एक शब्द आहे.

3 / 5
या शब्दाचा अर्थ तांदूळ असा होतो. बिर्याणी हा पदार्थ तयार करताना अगोदर तांदळाळा तुपात मिसळून तळले जायचे. त्यानमंतर मंद आचेवर मटणासोबत तांदळाला शिजवले जायचे. अनेक इतिहासकारांच्या मते बिर्याणी या खाद्यपदार्थाची उत्त्पत्ती ही फारशी पुलावापासून झालेली आहे. मुघल शासकांनी बिर्याणीला भारतात आणले असेही मानले जाते.

4 / 5
फारशी स्वयंपाकी भारतातील शाही स्वयंपाकघरात आले, त्यांनी भारतातील मसाल्यांच्या मदतीने बिर्याणीची निर्मिती केली. बिर्याणी या खाद्यपदार्थाच्या निर्मितीचा विषय निघाला की मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज महलचा उल्लेख केला जातो.

5 / 5
मुमताज महल एकदा सैन्याच्या कॅम्पमध्ये गेली होती. तिथे तिला सैनिक फारच कुपोषित  दिसले. त्यानंतर या महाराणीने मांस आणि तांदळाला मिळून एक पौष्टिक पदार्थ तयार करण्याचा आदेश दिला. तेव्हापासूनच बिर्याणीची सुरुवात झाल्याचे बोलले जाते.