
योगामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, त्यामुळे पीरियड्सचे त्रास, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), आणि मेनोपॉजशी संबंधित समस्या कमी होतात. त्यामुळे रोज महिलांनी स्वतःला वेळ द्या.

योगा केल्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. प्राणायाम आणि ध्यानामुळे मेंदू शांत राहतो, झोप चांगली लागते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. यामुळे अशक्तपणा जानवत नाही.

लवचिकता आणि ताकद वाढवते... नियमित योगासनांमुळे स्नायू लवचिक राहतात, शरीर मजबूत होते आणि सांधे निरोगी राहतात. योगामुळे मेटाबॉलिझम वाढतो, चरबी कमी होते आणि शरीर संतुलित राहते.

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर फायदेशीर योगा फायदेशीर ठरतो. योगा गर्भावस्थेत शरीर सुदृढ ठेवतो, प्रसूती सोपी होते आणि नंतर शरीर पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते.

योगा केल्याने रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेचा तेज वाढतो आणि केस गळणे कमी होते. ध्यान व आसनांमुळे स्वत: मध्ये होत असलेल्या बदलांची जाणीव होते. ज्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मप्रेम वाढते.