Gold Rule : घरात किती सोनं ठेवता येतं? 1 ग्रॅम जरी जास्त असलं तरी होते कारवाई; वाचा नियम काय?
भारतीय कायद्यानुसार घरात सोनं ठेवण्याला काही मर्यादा आहे. या मर्यादेचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते. याआधी आतापर्यंत अनेकदा अशी कारवाई करण्यात आलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या किमान वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, असे भारतातील नागरिकांना आवाहन केले आहे. भारतातील पैसा हा परदेशात जाऊ नये म्हणून मोदींनी तसे आवाहन केले आहे. दरम्यान, सोनं साठवून ठेवण्याच्या नियमाबाबत जाणून घेऊ या..

भारतीय कायद्यानुसार घरात सोनं ठेवण्याला काही मर्यादा आहे. या मर्यादेचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते. याआधी आतापर्यंत अनेकदा अशी कारवाई करण्यात आलेली आहे. प्राप्तिकर कायद्यात सोन्याच्या साठवणुकीबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

भारतीय कायद्यानुसार तुम्ही कितीही सोन्याची खरेदी करू शकता. परंतु तुम्ही खरेदी केलेले सोने कुठून केलेले आहे हे तुम्हाला सिद्ध करावे लागते. तसेच तुम्ही हे सोने वैध पद्धतीने खरेदी केल्याचा पुरावाही तुम्हाला द्यावा लागतो.

हे पुरावे तुम्ही न दाखवू शकल्यास तुमच्यावर प्राप्तीकर कायद्यानुसार कारवाई होते. भारतात एका विवाहित महिलेकडे 500 ग्रॅमपर्यंत, अविवाहित महिलेकडे 250 ग्रॅम तर पुरुषाकडे 100 ग्रॅमपर्यंतचे सोने असेल तर त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)