
वक्फ बोर्ड इस्लामी कायद्यानुसार धर्मार्थ कारणासाठी दान केलेल्या संपत्तीचा सांभाळ करतो.एकदा संपत्ती दान केली की ती दान करणाऱ्या व्यक्तीकडून अल्लाला ट्रान्सफर होते, मग त्यात बदल करता येत नाही.

हैदराबादच्या निजामांनी वक्फ बोर्डाला सर्वाधिक संपत्ती दान केली आहे. हैदराबादमध्ये १० निजाम झालेत,पहिला मीर कमरुद्दीन खान ( १७२४-१७४८) आणि शेवटचा मीर उस्मान अली खान.

प्रतिकात्मक छायाचित्र

शहाजहान आणि औरंगजेबनेही दिल्ली,आगरा आणि हैदराबादमध्ये धार्मिक कारणासाठी जमीनी दान केल्या आहेत. हजरत निजामुद्दीन औलिया ( दिल्ली ),ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ( अजमेर ) या सूफी संताच्या दर्गाहना त्यांच्या अनुयायांनी शेकडो एकर जमीन दान केली आहे.

सालार मसूद गाजी ( बहराईच ) आणि बाबा फरीद ( पंजाब ) यांच्या दर्गाहना मोठ्या वक्फ संपत्ती मिळाल्या आहेत.अहमदाबादच्या सर सैयद मुहम्मद आणि वकील सारख्या उद्योगपतींनी वक्फला जमीन दान केली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारात मुस्लीम जमीनदारांनी ग्रामीण क्षेत्रात शेकडो एकर जमीन वक्फला दान केली आहे.अनेकांनी गावेच्या गावे या वक्फ बोर्डाला दान केली आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. या कायद्यात सुसूत्रा नसल्याने सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

वक्फला संपत्ती दान करण्यात माजी उपराष्ट्रपती अब्दुल हमीद अन्सारी,दिग्गज उद्योगपती विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी शैक्षणिक , वैद्यकीय कारणांसाठी हजारो एकर जमीन वक्फला दान केली आहे.देवबंद आणि नदवतुल उलमा सारख्या संस्थांना देखील त्यांच्या धार्मिक क्रियासाठी जमीनी दान मिळाल्या आहेत