
अक्षय कुमार : एका वृत्तानुसार, अक्षय कुमार लग्नात सहभागी होण्यासाठी आणि डान्स परफॉर्म्स करण्यासाठी 2.5 कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार त्याच्या उत्साही व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो आणि त्याचे नृत्य सादरीकरण खूपच मनोरंजक असते. अक्षयने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की लग्नात डान्स परफॉर्म्स करण्यात त्याला कोणतीही लाज वाटत नाही. तो ते मनापासून एन्जॉय करतो.

रणबीर कपूर-आलिया भट्ट : दरम्यान, रणबीर कपूर अशा खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तब्बल 2 कोटी घेतो. तर आलिया भट्ट 1.5 कोटी घेते.

विकी कौशल ; विकी कौशलची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यामुळे त्यालाही आता इव्हेंट, लग्न, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जातं. तो यासाठी 1 कोटी रुपये घेतो.

हृतिक रोशन : हृतिक रोशन देखाल खाजगी कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो. त्यासाठी तो 2.5 कोटी मानधन घेतो.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग : दीपिका पदुकोण लग्नात किंवा कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 कोटी घेते, तर, रणवीर सिंगही 1 कोटी रुपये घेते.

सलमान खान : सलमान खान तसेही फार कमी अशा खाजगी कार्यक्रमात सहभागी होतो. पण जेव्हा तो अशा कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो तेव्हा 2 कोटी रुपये घेतो असं म्हटलं जातं.

शाहरुख खान : दरम्यान या यादीतील सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स म्हणजे कतरिना कैफ आणि शाहरुख खान. शाहरूख खान तब्बल 3 कोटी घेतो.

कतरिना कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 3.5 करोड घेते