अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा वाचून धक्काच बसेल
Antilia : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलियामध्ये काम करणाऱ्या सिक्यूरिटी गार्डला किती पगार आहे? जाणून घ्या..

मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबासोबत ‘अँटिलिया’मध्ये राहतात. हे जगातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे. या आलिशान घराला चालवण्यासाठी किती लोकांची गरज असते, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘अँटिलिया’मध्ये ५०० हून अधिक नोकर काम करतात. हे कर्मचारी घरातील रोजच्या कामांना सुरळीतपणे चालवण्यासाठी मदत करतात.
अँटिलियामध्ये काम करणाऱ्या सिक्यूरिटी गार्डला किती पगीर असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अँटिलियामध्ये काम करणाऱ्या नोकरांना चांगला पगार मिळतो. इंडिया टीव्हीच्या अहवालानुसार, अनेक नोकरांचा मासिक पगार १.५ लाख ते २ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हा पगार खूप आकर्षक असून त्यामुळे त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे चालते.
अँटिलियामध्ये सिक्यूरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील १.५ लाख ते २ लाख रुपये पगार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पगाराशिवाय ‘अँटिलिया’च्या कर्मचाऱ्यांना अनेक इतर सुविधाही मिळतात. त्यांना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे मेडिकल इन्शुरन्स आणि इतर फायदे दिले जातात.
अँटिलियामध्ये काम करणाऱ्यांचा पगार आणि सुविधा त्यांच्या काम आणि जबाबदाऱ्यांनुसार ठरवल्या जातात. हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, शेफ, पर्सनल अटेंडंट असे प्रत्येक कर्मचारी घर सुरळीत चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.