पोस्ट ऑफीसच्या टीडी योजनेत वर्षभर 2 लाख रुपये जमा केल्यास, वर्षाला किती व्याज मिळेल ?

पोस्ट ऑफिसच्या १२ महिन्यांच्या टीडी योजनेत ₹२,००,००० गुंतवून मिळणारे व्याज आणि एकूण रक्कम जाणून घ्या. ६.९% व्याजदराने, तुम्हाला एका वर्षाच्या शेवटी चांगले व्याज मिळेल.

| Updated on: Mar 27, 2026 | 9:30 PM
1 / 5
जर तुम्ही पोस्ट ऑफीसच्या १२ महिन्यांच्या मुदत ठेव ( टीडी ) योजनेत दोन लाख रुपये रुपये गुंतवले तर तुम्हाला किती व्याज आणि एकूण रक्कम मिळेल, हे जाणून घेऊयात.पोस्ट ऑफीसच्या बचत योजना या सरकारी योजना असून येथे पैशांना संपूर्ण संरक्षण असते.

जर तुम्ही पोस्ट ऑफीसच्या १२ महिन्यांच्या मुदत ठेव ( टीडी ) योजनेत दोन लाख रुपये रुपये गुंतवले तर तुम्हाला किती व्याज आणि एकूण रक्कम मिळेल, हे जाणून घेऊयात.पोस्ट ऑफीसच्या बचत योजना या सरकारी योजना असून येथे पैशांना संपूर्ण संरक्षण असते.

2 / 5

पोस्ट ऑफीसच्या आरडी, एमआयएस, एससीएसएस आणि पीपीएफ यांसारख्या विविध बचत योजना आहेत. टीडी ही योजना बँकेच्या एफडी सारखी असते. यात ठराविक कालावधीसाठी पैसा गुंतवला जातो. त्याद्वारे हमीयुक्त परतावा मिळतो.

3 / 5

पोस्ट ऑफीसात टीडी योजनेचे खाते १ वर्षे, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी उघडता येते. सध्या पोस्ट ऑफीस १ वर्षांच्या टीडी योजनेवर ६.९ टक्के व्याज, २ वर्षांसाठी ७.० टक्के, ३ वर्षांसाठी ७.१ टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज देते.

4 / 5

तुम्ही टीडी योजनेत एका वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवले तर वर्षांच्या शेवटी ६.९ टक्के व्याजदराने तुम्हाला अंदाजे १४,१६१ रुपये व्याज मिळेल. म्हणजे मुदतीनंतर तुम्हाला एकून २ लाख १४ हजार १६१ रुपये मिळतील.

5 / 5

पोस्टाची टीडी योजना सर्व वयोगटातील गुंतवणूकदारांना समान व्याजदर देते. याऊलट सामान्यत: जेष्ठ नागरिकांना ०.५० टक्के उच्च व्याजदर देतात. काही बँका तर ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना अधिक व्याजदर देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us