MS Dhoni: क्रिकेटमधून निवृत्ती, तरीही महिन्याला कोट्यवधींची कमाई; धोनीच्या उत्पन्नाचे आकडे पाहून व्हाल थक्क!

MS Dhoni: धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्याचा ब्रँड व्हॅल्यू आजही कायम आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने बिझनेस आणि जाहिरातींवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. IPLमध्येही त्याचा सहभाग कायम आहे. त्यामुळे मैदानावरून निवृत्ती घेतली असली तरी ‘कॅप्टन कूल’ची कमाईची इनिंग अजूनही जोरदार सुरू आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 8:12 AM
1 / 5
भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सहा वर्षे झाली आहेत. मात्र मैदानापासून दूर गेल्यानंतरही त्याच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. IPL, ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय आणि BCCI कडून मिळणारी पेन्शन, अशा अनेक माध्यमांतून धोनीची कमाई सुरू आहे.

भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सहा वर्षे झाली आहेत. मात्र मैदानापासून दूर गेल्यानंतरही त्याच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. IPL, ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय आणि BCCI कडून मिळणारी पेन्शन, अशा अनेक माध्यमांतून धोनीची कमाई सुरू आहे.

2 / 5

त्यामुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. धोनीने भारतासाठी तब्बल 90 कसोटी सामने खेळले आहेत. BCCIच्या सध्याच्या पेन्शन व्यवस्थेनुसार 25 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी पुरुष क्रिकेटपटूंना दरमहा 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्यामुळे धोनीलाही या योजनेचा लाभ मिळतो.

3 / 5

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीचा IPL प्रवास सुरूच आहे. 2026 च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. ही रक्कम 12 महिन्यांत विभागली तर दरमहा सुमारे 33.3 लाख रुपये इतकी होते. अर्थात, IPLचा करार संपूर्ण हंगामासाठी असतो, त्यामुळे हा केवळ सरासरी मासिक आकडा आहे.

4 / 5

याशिवाय 2026 पासून लागू असलेल्या मॅच फी नुसार खेळलेल्या सामन्यांमधून त्याला अतिरिक्त कमाई होऊ शकते. धोनीच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा हिस्सा ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींमधून येतो. 2026 मधील विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची वार्षिक कमाई 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.

5 / 5

2025-26 या कालावधीसाठी त्याची कमाई सुमारे 95 ते 105 कोटी रुपये असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये जाहिराती आणि ब्रँड डील्सचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. काही रिपोर्ट्सनुसार धोनीची मासिक कमाई जवळपास 6 ते 8 कोटी रुपये असू शकते. मात्र हा निश्चित पगार नसून IPL, जाहिराती, व्यवसाय आणि इतर उत्पन्नाच्या स्रोतांवर आधारित अंदाज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us