
जर तुम्हालाही लॅपटॉप काम झाल्यावर बंद न करता स्लीप मोडवर ठेवण्याची सवय लावली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक लोक लॅपटॉपला स्लीप मोडमध्ये ठेवतात. पण यामुळे तुमच्या लॅपटॉपचे मोठे नुकसान होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप नियमितपणे बंद केल्याने त्याचे आयुष्य आणि कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे आपण लॅपटॉप बंद करण्याचे मुख्य फायदे काय हे जाणून घेऊया.

जेव्हा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये असतो, तेव्हा त्याची बॅटरी सतत काम करत राहते. त्यामुळे बॅटरीची ऊर्जा वापरली जाते. कालांतराने बॅटरीची क्षमता कमी होते. पण लॅपटॉप पूर्णपणे बंद केल्यावर बॅटरीचा वापर थांबतो. ज्यामुळे तिचे आयुष्य वाढते.

स्लीप मोडमध्ये लॅपटॉप ठेवल्यास तुमचा डेटा सायबर हल्लेखोरांसाठी सहज उपलब्ध असतो. लॅपटॉप पूर्णपणे बंद केल्यावर सर्व डेटा सुरक्षित होतो, ज्यामुळे हॅकर्सना तुमची माहिती चोरणे कठीण होते.

लॅपटॉप स्लीप मोडमध्ये असताना, बॅकग्राउंडमध्ये अनेक प्रोग्राम चालू राहतात, ज्यामुळे डिव्हाईस स्लो होतो. लॅपटॉप शटडाउन केल्यावर हे सर्व प्रोग्राम बंद होतात. तुमच्या डिव्हाइसची कार्यक्षमता वाढते.

जर लॅपटॉप स्लीप मोडमध्ये असेल आणि विजेच्या प्रवाहाचा अचानक दाब वाढला तर लॅपटॉपला मोठे नुकसान होऊ शकते. लॅपटॉप बंद केल्यावर या धोक्यापासून पूर्णपणे संरक्षण मिळते. या कारणांमुळे, लॅपटॉप वापरल्यावर तो नियमितपणे बंद करणे हे तुमच्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.