
आजकाल प्रत्येकालाच वाटते की समाजात मला मान, सन्मान मिळावा. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करत असतात. परंतु आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात हा मान-सन्मान सहज येऊ शकतो.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्हाला आयुष्यात सन्मान हवा असेल तर अगोदर स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला सन्मान दिल्यास लोकही तुम्हाला सन्मान देतात. आत्मसन्मान असेल तर लोकही तुम्हाला खूप सन्मान द्यायला लागतात.

तुम्हाला लोकांकडून सन्मान हवा असेल तर स्वत: घेतलेलेल्या निर्णयांचा सन्मान करा. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी करण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या केल्याशिवाय मागे हटू नका. तुमच्या शब्दाला किंमत असावी, असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कृती ही तुमच्या वागणुकीसारखीच असायला हवी.

अनेकजण प्रमाणापेक्षा गोड बोलण्याचा, चांगले राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु चाणक्य नीतीनुसार प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलल्याने तुमची किंमत कमी होते. तसेच तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तर समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता लगेच असहमत असल्याचे सांगा. याने तुमच्या मताला किंमत राहते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.