या झाडाची पानं म्हणजे झुरळांचे कट्टर शत्रू, घरात आणल्यास झुरळं लगेच जातील पळून!

तुमच्या घरात असलेला कढीपत्ता झुरळं घरातून घालण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतो. कढीपत्त्याचा उपयोग कसा करायचा? ते जाणून घेऊ या. हा उपाय करण्यासाठी कसलेही पैसे खर्च करण्याची गरज नाही.

| Updated on: Mar 28, 2026 | 11:04 PM
1 / 5
कॉकरोच म्हणजेच झुरळ साधारण प्रत्येक घरात दिसतो. घरात सामानाची गर्दी झाली की समजा तिथे झुरळ होणारच. एकदा का घरात झुरळ झाले की नंतर मात्र फारच डोकेदुखी वाढते. हा त्रास होऊ नये म्हणून अनेकजण वेगवेगळे उपाय करतात.

कॉकरोच म्हणजेच झुरळ साधारण प्रत्येक घरात दिसतो. घरात सामानाची गर्दी झाली की समजा तिथे झुरळ होणारच. एकदा का घरात झुरळ झाले की नंतर मात्र फारच डोकेदुखी वाढते. हा त्रास होऊ नये म्हणून अनेकजण वेगवेगळे उपाय करतात.

2 / 5

विशेष म्हणजे झुरळ हे अन्नात, भांडे, कपडे अशा सर्वच ठिकाणी जातात. त्यामुळे जास्तच मनस्ताप होतो. हीच अडचण होऊ नये यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

3 / 5

काही लोक घरातील झुरळ नाहीसे व्हावेत यासाठी हजारो रुपये खर्च करतात. परंतु तमच्या भाजी-पाल्यातील कढीपत्त्याच्या मदतीने तुम्ही झुरळांचा नायनाट करू शकता. कढीपत्याची पाने रगडून ज्या ठिकाणी झुरळ आहेत, त्या ठिकाणी ही पाने टाकल्यावर झुरळं पळून जातात.

4 / 5

या पर्यायाचा अवलंब केल्यास तुमच्या घरातील झुरळ निघून जातात. झुरळांना कढीपत्त्याचा वास आवडत नाही. त्यामुळेच ते घरातून काढता पाय घेतात. घरातील झुरळं घालवण्यासाठी इतरही काही घरगुती उपयांचा अवलंब करता येऊ शकतो.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us