हे छोटं झाडं म्हणजे पालींचा कट्टर शत्रू, किचनमध्ये गुपचूप ठेवा, लगेच जातील पळून!

पाल पाहिली की अनेकांना चीड येते. किचनमध्ये, बेडरुममध्ये अशा सर्वच ठिकाणी पाल दिसते. परंतु एक रुपयाही न खर्च करता तुम्ही पालींना तुमच्या घरातून पळवून लावू शकता. हे कसं शक्य आहे, ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 01, 2026 | 12:16 AM
1 / 5
अनेकदा किचनमध्ये गेलं की लपून बसलेली पाल तुमच्यासमोर येते. पाल दिसतात अनेकांना चीड येते. तर काही लोक थेट पळ काढतात. घरात एकदा पाल दिसायला लागली की तिला घरातून बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते.

अनेकदा किचनमध्ये गेलं की लपून बसलेली पाल तुमच्यासमोर येते. पाल दिसतात अनेकांना चीड येते. तर काही लोक थेट पळ काढतात. घरात एकदा पाल दिसायला लागली की तिला घरातून बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते.

2 / 5

घरात एकदा पाल आली की पुढच्याच काही दिवसांनी तुम्हाला एका पालीच्या दोन ते तीन पाली झालेल्या पाहायला मिळतील. त्यानंतर घर म्हणजे पालींचे साम्राज्य आहे की काय? असाही प्रश्न अनेकदा पडतो. काही लोक पालींना घराबाहेर काढण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु त्यात यश येत नाही.

3 / 5

विशेष म्हणजे घरातील पालींमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पालींची विष्ठा पाण्यात, अन्नात पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच आता एक रुपयाही खर्च न करता घरातून पालींना कसे पळवून लावावे ते जाणून घेऊ या. तुमच्या घरातील तुळशीचे झाड हे फार गुणकारी असते.

4 / 5

तुळशीचे झाड हे घरातील पालींना पळवून लावण्यासाठी खूपच कामाला येते. पालींना कोणत्याही पदार्थाचा लवकर वास येतो. पालींना तुळशीच्या पानांचा गंध आवडत नाही. म्हणूनच तुळशीचे झाड किचनच्या खिडकीत, दरवाजात ठेवले तर पाली तेथून पळ काढतात, असे सांगितले जाते.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us