आयुष्यात कधी घरात दिसणार नाही मच्छर, फक्त ‘हे’ उपाय करा, तिसरी गोष्ट तर एकदम सोप्पी!

उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. एकीकडे गरमी आणी दुसरीकडे मच्छरांचा चावा यामुळे घरात बसलेली व्यक्ती अगदी वैतागून जाते.

| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 6:39 PM
1 / 7
उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. एकीकडे गरमी आणी दुसरीकडे मच्छरांचा चावा यामुळे घरात बसलेली व्यक्ती अगदी वैतागून जाते. मात्र हेच मच्छर घरातून पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपया आहेत. या उपायांची अंमलबजावणी केल्यास तुमच्या घरातील मच्छर पळून जातील.

उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. एकीकडे गरमी आणी दुसरीकडे मच्छरांचा चावा यामुळे घरात बसलेली व्यक्ती अगदी वैतागून जाते. मात्र हेच मच्छर घरातून पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपया आहेत. या उपायांची अंमलबजावणी केल्यास तुमच्या घरातील मच्छर पळून जातील.

2 / 7

लेमनग्रास ऑईलचा प्रयोग- लेमनग्रास ऑईल हे डिफ्युजर किंवा कॉटन बॉलवर लावून खोलीत ठेवावे. यामुळे घरात मच्छर येत नाहीत.

3 / 7

पुदीना आणि तुळसीचे झाड- घरात पुदीना आणि तुळसीचे झाड लावल्यास मच्छर येत नाहीत. तसेच हवादेखील शुद्ध राहते.

4 / 7

कुंडीमध्ये पाणी जमा होऊ देऊ नका- स्थिर पाण्यात मच्छरांची वाढ होते. त्यामुळे कुंडी, कुलर, पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जमा होऊ देऊ नये. त्यांची नियमितपणे साफसफाई करावी.

5 / 7

कापूर लावा - मच्छरांना घरातून हाकलून लावायचे असेल तर घरात कापूर लावावा. कापूर लावून थोड्या वेळासाठी खोली बंद करून टेवावी. तसे केल्यास मच्छर येणार नाहीत.

6 / 7

लिंबाच्या पाल्याचा धूर किंवा तेल- खोलीमध्ये लिंबाच्या झाडाच्या पानांचा धूर केल्यास मच्छरांचा नायनाट होतो. हा धूर करताना लिंबाच्या पाल्यात खोबरेल तेल टाकावे. ज्यामुळे घरातील मच्छर निघून जातात.

7 / 7

लसणाचा स्प्रे- लसणाच्या पाकळ्या पाण्यात उकळून तो साफ करावा. याच पाण्याचा घरात स्प्रे मारल्यावर घरातील मच्छर पळून जातात. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us