
घरात येणारे मच्छर, झुरळं, डास, पाली यांच्या त्रासाला सगळेच कंटाळलेले असतात. मात्र या सर्व कीटकांमध्ये एक असा कीटक येतो ज्याचे नाव ऐकताच आपल्या सर्वांचीच बोबडी वळते. हा कीटक म्हणजे ढेकूण.

ढेकूण हा असा कीटक आहे जो आपल्या बेडवर, सोफ्यात लपून बसतो. एखादे गाव असो किंवा मोठे शहर तुमच्या घरात एकदा ढेकूण शिरला की त्याचा नायनाट करणे कठीण असते.

ढेकूण हे दिसायला लहान असले तरी हे कीटक प्रचंड धोकादायक असतात. बहुतांश वेळा लाकडी फर्निचरमध्ये हे मोठ्या प्रमाणात आढळतात. अस्वच्छता आणि धूळ हे घरात ढेकूण होण्याचे कारण आहे.

ढेकूण जास्त दिवस घरात राहिले तर वस्तूंसोबतच आरोग्यालाही नुकसान होते. जर तुमच्याही घरात ढेकूण असतील आणि तुम्हाला त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करुन त्यापासून सुटका मिळवू शकता.

ढेकूण घालवण्यासाठी कडुलिंबाचे तेल एखाद्या रामबाण उपायासारखे काम करते. त्याचा वापर करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला कडुलिंबाचे तेल एका स्प्रे बॉटलमध्ये भरावे लागेल. यानंतर ते ढेकूणावर शिंपडावे लागेल.

तुम्ही तुमच्या घरातील फर्निचरच्या कोपऱ्यांमध्येही हे तेल शिंपडू शकता. कडुलिंबाच्या तेलाच्या उग्र वासामुळे ढेकूण दूर जातात. पण हे एक दिवसात होत नाही, यासाठी तुम्हाला ही प्रक्रिया तीन ते चार दिवस सातत्याने करावी लागेल.

लसणाचा वासही खूप तीव्र असतो, जो ढेकणांना आवडत नाही. लसणाच्या काही पाकळ्या घेऊन त्यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट ढेकूण लपलेल्या ठिकाणी लावा. यामुळे काही दिवसांतच ते मरून जातील.

लसणाप्रमाणेच पुदिन्याच्या पानांचा वापर करता येतो. पुदिन्याची पाने वाटून त्याची पेस्ट बनवा। ती ढेकूण असलेल्या जागी लावा. पुदिन्याच्या वासाने ढेकूण ती जागा सोडून पळून जातात.

कांदा कापून त्याचा वाटून रस काढा. हा रस एका स्प्रे बॉटलमध्ये घेऊन ढेकूण असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. कांद्याच्या तीव्र वासाने ढेकूण तात्काळा नष्ट होतील.

हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत. मात्र तुमच्या घरात जर ढेकणांचा तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही प्रोफेशनल पेस्ट कंट्रोलवाल्यांची मदत घेऊ शकता.