दुधावर जाड मलईचा कशी आणायची? जाणून घ्या सोप्या घरगुती टिप्स
घट्ट, जाड मलई मिळवण्यासाठी विविध घरगुती पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो पण कोणत्या सोप्या पद्धतीने हे शक्य आहे जाणून घ्या.
1 / 5

मलाई जाड जमण्यासाठी दीड ते दोन लिटर फुल क्रीम दूध घ्या. त्यात अर्धा ग्लास पाणी घालून मंद आचेवर गरम करा.
2 / 5
दूध गरम करण्यापूर्वी भांड्याच्या कडांना थोडे तूप लावा. यामुळे दूध उतू जाण्याची शक्यता कमी होते आणि मलाई जमण्यास मदत होते.
3 / 5
दूध उकळायला लागल्यावर त्यात ७-८ तांदळाचे दाणे घालून हलवा. तांदळातील स्टार्चमुळे मलाईला घट्टपणा येण्यास मदत होते.
4 / 5
दूध उकळल्यानंतर लगेच झाकण ठेवू नका. जाळीदार झाकण ठेवून दूध पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत न हलवता तसेच ठेवा.
5 / 5
दूध पूर्ण थंड झाल्यावर ५-६ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी वर जमलेली जाड मलाई काढून त्यापासून घरच्या घरी तूप, लोणी आणि मावा तयार करू शकता.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us