AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: खात्यात नाही जमा झाले पीएम किसानचे 2000 रुपये? 25 वा हप्ता सुद्धा अडकणार का?

PM Kisan Yojana 25th Installment: पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता गेल्या महिन्याच्या अखेरीस 30 ऑक्टोबर रोजी मिळाला. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. मग आता त्या शेतकर्‍यांना 25 वा हप्ता सुद्धा नाही मिळणार?

PM Kisan Yojana: खात्यात नाही जमा झाले पीएम किसानचे 2000 रुपये? 25 वा हप्ता सुद्धा अडकणार का?
25 वा हप्ता सुद्धा अडकणार का?
| Updated on: Nov 21, 2026 | 1:43 PM
Share

PM Kisan Yojana 25th Installment: शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू आहे. या योजनेत केंद्र सरकार पात्र शेतकर्‍यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येतात. दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. अलिकडेच 24 वा हप्ता वितरीत करण्यात आला. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. काही तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळू शकली नाही. मग आता त्यांचा 25 वा हप्ता सुद्धा अडकणार का?

का अडकतो हप्ता, काय कारणं?

या योजनेच्या निकषानुसार, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा होत नाही. यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत. माहितीनुसार, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल. डीबीटी सेवा बंद असेल. भू सत्यापन अपूर्ण असेल अथवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर हप्ता अडकू शकतो. अशा वेळी लाभार्थ्यांना वेळेवर निधी मिळत नाही.

25 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 25 वा हप्ता आता पुढील वर्षी मिळेल. या योजनेचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी वितरीत करण्यात आला. या योजनेत हप्ते वितरीत करण्याची पद्धत पाहता, दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. त्यानुसार, 25 वा हप्ता फेब्रुवारी 2027 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. याविषयीची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

पुढील हप्त्याचा लाभ विनाअडथळा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी, भू-सत्यापन, आधार सीडिंग आणि बँक खात्यातील डीबीटी स्थिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. खात्यात कोणतीही त्रुटी दिसून आल्यास ती तातडीने दुरुस्त करून घेतल्यास आगामी हप्त्याचे नियोजन सुरळीत राहण्यास मदत होते.

e-KYC अशी करा

शेतकरी तीन प्रकारे पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

OTP आधारे e-KYC (पीएम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर आधारीत)

बायोमॅट्रिक आधारे e-KYC (कॉमन सर्व्हिस सेंटर आणि राज्य सेवा केंद्रावरून करता येईल)

फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध )

OTP आधारे e-KYC कशी कराल

पीएम किसान योजनेच्या अधिकृत साईटवर जा

e-KYC पर्यायावर क्लिक करा

या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवा आणि मोबाईलवर आलेला OTP नोंदवा.

फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC

Google Play Store मध्ये PM-Kisan Mobile App आणि Aadhaar Face RD App डाऊनलोड करा

आता ॲप उघडा आणि पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करा

Beneficiary Status या पेजवर जा.

याठिकाणी e-KYC ची स्थिती No दाखवत असेल तर e-KYC वर क्लिक करा

यानंतर तुमचा आधार क्रमांक नोंदवा, तुमचा चेहरा स्कॅन करा

चेहरा स्कॅन झाल्यावर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल

बँक खात्याला आधार कार्डशी लिंक करा

पीएम किसान योजनेची रक्कम Direct Benefit Transfer (DBT) द्वारे आधार खात्याशी संबंधित खात्यात जमा होते. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी बँक शाखेत जा. Aadhaar Seeding Form भरा. तुमचे खाते NPCI च्या खात्याशी लिंक करा. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन Know Your Status मध्ये Aadhaar Bank Seeding Status तपासाल.

पीएम किसानसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्‍याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.

Follow Us
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट