
कलिंगड अधिक चांगले दिसण्यासाठी फळ विक्रेते कृत्रिम रंग व रसायनांचा वापर करतात. काही वेळा इंजेक्शनद्वारे कलिंगडांना कृत्रिम रंग दिला जातो. त्यामुळे रसदार लालभडक कलिंगड घेण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

कलिंगडचा एक भाग नेहमी जमिनीला टेकलेला असतो. हा भाग नैसर्गिकरित्या किंचित पिवळसर असतो. परंतु बाजारात जेव्हा तुम्हाला संपूर्ण कलिंगड एकसारख्या रंगाचे दिसेल तेव्हा ते कृत्रिमरित्या पिकवलेले असण्याची शक्यता आहे.

कलिंगडचा रंग नैसर्गिक आहे की नाही, ते तपासण्यासाठी त्याचा एक तुकडा पाण्यात टाका. जर पाणी गुलाबी झाले तर कलिंगडाला कृत्रिम रंग दिलेला असण्याचे स्पष्ट होईल.

Watermelon

लालसर, रसाळ कलिंगड दिसण्यास मोहक दिसत असले तरी त्यात रसायनांचा वापर केल्यावर आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक फळांची निवड करा.