Tips and Tricks : मऊसूत, लुसलुशीत पोळ्या हव्यात ? तुमच्या किचनमध्येच आहेत हे उपाय, पटकन करा ट्राय

पोळी मऊसूत होण्यासाठी पीठ मळण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. योग्य तंत्राचा अवलंब केल्याने पोळी हलकीफुलकी आणि मऊ होते. पोळ्या कडक होत असतील तर त्या मऊ होण्यासाठी खास ट्रिक्स घ्या जाणून

| Updated on: Apr 25, 2026 | 3:35 PM
1 / 10
तव्यावरून ताटात.. गरमागरम पोळी खाण्याची मजा काही वेगळीच असते. पण दरवेळेस गरम गरम जेवता येत नाही आणि सकाळी किंवा एकदा करून ठेवलेल्या पोळ्या, थोड्या वेळाने वातड, कडक होता. पुन्हा ती पोळी खाताना फार त्रास होते, अशी पोळी खाणं अवघड जातं. (Image Credit Source: Social Media)

तव्यावरून ताटात.. गरमागरम पोळी खाण्याची मजा काही वेगळीच असते. पण दरवेळेस गरम गरम जेवता येत नाही आणि सकाळी किंवा एकदा करून ठेवलेल्या पोळ्या, थोड्या वेळाने वातड, कडक होता. पुन्हा ती पोळी खाताना फार त्रास होते, अशी पोळी खाणं अवघड जातं. (Image Credit Source: Social Media)

2 / 10

तुमच्यासोबतही असे घडते का? पोळी मऊ न राहण्याचे मुख्य कारण म्हणजे, अनेकदा पीठ मळण्याची चुकीची पद्धत किंवा काही किरकोळ चुका असतात.

3 / 10

जर तुम्हाला तुमची पोळी नुकतीच बनवल्याप्रमाणेच मऊसूत, लुसलुशीत राहावी असे वाटत असेल, तर पीठ मळताना तुम्ही काही खास युक्त्या वापरू शकता. चला, काही सोप्या पण प्रभावी पद्धती जाणून घेऊया, ज्यामुळे तुमची पोळी कित्येक तास कापसासारखी मऊ राहील.

4 / 10

पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा. ​​यामुळे पीठ अधिक मऊ आणि लवचिक होते आणि पोळी छान फुगते.

5 / 10

जेव्हा पीठ मळाल तेव्हा त्यात एक छोटा चमचा तूप किंवा तेल घातल्याने पीठ मऊ होते. तुपामुळे पोळी मऊ राहते आणि जास्त वेळ कोरडी होत नाही.

6 / 10

पोळी अधिक मऊ व्हावी यासाठी, त्यात पाण्यासोबत थोडे दूध किंवा एक-दोन चमचे दही घाला. दुधामुळे पोळी पांढरीशुभ्र आणि मऊ होते, तर दह्यामुळे पोळी थंड झाल्यावरही कडक होत नाही.

7 / 10

बरेच लोक पीठ मळून झाल्यावर लगेच पोळ्या लाटायला सुरूवात करतात. पण ही पद्धत योग्य नाही. कणीक मळून झाल्यावर किमान 10 ते 15 मिनिटं ती ओल्या फडक्याने झाकून ठेवा, चांगली मुरू द्या.

8 / 10

या दरम्यान पिठातील ग्लूटेन सक्रिय होते, ज्यामुळे पोळी चांगली फुगते आणि तिला तडे जात नाहीत.

9 / 10

पोळी झाल्यावर ती थेट हवाबंद डब्यात किंवा हॉटकेसमध्ये ठेवू नये. पोळी ताटात घेऊन वाफ काढावी, नंतर ती एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून ठेवावी. सुती कापड ओलावा शोषून घेते, ज्यामुळे पोळी चिकट होत नाही आणि बराच वेळ मऊ राहते.

10 / 10

या छोट्या पण फायदेशीर उपायांचा अवलंब केल्यास, घरी बनवलेली पोळी खूप तासांनी देखील खूप मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट राहू शकते. या सोप्या पाककृती टिप्स प्रत्येक घरात उपयुक्त ठरू शकतात आणि रोजच्या पोळीची चव वाढवू शकतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us