
चहा म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. अनेक भारतीयांसाठी ही केवळ एक सवय नाही, तर सकाळची ऊर्जा आणि दिवसभराचा उत्साह आहे. प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक खास पद्धत असते.

पण टपरीवरचा चहा पिण्याची मजा काही औरच असते. अनेकदा आपल्याला टपरीवरचा चहा घरी बनवून पिण्याची इच्छा होते. मात्र तो अनेकदा फसतो. आज आपण टपरीवरचा चहा कसा बनवायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार चहा बनवतो, पण ब्रिटिश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन (BSI) ने चहा बनवण्याची ठराविक पद्धत सांगितली आहे. यामुळे तुमचा चहा आणखी स्वादिष्ट आणि परफेक्ट बनतो.

या स्टँडर्डनुसार, चहा बनवताना तुम्हाला फक्त दोन भांडी वापरायची आहेत आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

एका भांड्यात दूध उकळवा आणि दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी उकळवा. पाणी आणि दुधाचे प्रमाण साधारणपणे समान ५० टक्के ठेवावे. पाणी गरम झाल्यावर त्यात चहा पावडर आणि चवीनुसार साखर घाला.

चहा चांगला उकळू द्या. जर तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही आले, लवंग किंवा वेलची घालू शकता. चहा चांगला उकळल्यानंतर, त्यात उकळलेले दूध घाला.

दूध घातल्यानंतर चहा जास्त वेळ उकळू नका. तो व्यवस्थित गरम झाल्यावर लगेच गाळून घ्या. या पद्धतीमुळे चहा आणि दूध एकत्र होते. त्यामुळे चहा खूपच चविष्ट होतो.

यामुळे पुढच्या वेळी चहा बनवताना तुम्हीही हा ब्रिटिश स्टँडर्ड टी (British Standard Tea) एकदा तरी ट्राय करायला हवा.