Cockroach Control Tips : ही चार झाडं म्हणजे झुरळांचा कर्दनकाळ, घरातून लगेच जातील पळून, चौथ्या झाडाचे पान तर नंबर 1 चा शत्रू!

घरात एखादे झुरळ दिसले की पुढच्याच दोन ते तीन दिवसांत संपूर्ण घरात अनेक झुरळ पाहायला मिळतात. प्लास्टिकच्या वस्तूंवर तसेच जेवणावरही सगळीकडेच झुरळ दिसतात. त्यामुळेच झुरळ घालवण्यासाठी नेमके कोणकोणते पर्याय आहेत, असे अनेकदा विचारले जाते.
तुम्ही तुमच्या घरात तसेच किचनमध्ये काही झाडे लावल्यास झुरळ पळून जाऊ शततात. या झाडांच्या गंधामुळे झुरळे घराच्या बाहेर पळून जातात असे सांगितले जाते. यातील पहिले झाड हे पुदिन्याचे आहे. पुदिन्याच्या झाडाला किचन किंवा खिडकीत ठेवल्यास झुरळ कमी होतात.
घरात तुळशीचे रोपटे लावल्यावरही झुरळं पळून जातात असे सांगितले जाते. तुळशीच्या पानांचा गंध झुरळांना आवडत नाही. कडुलिंबाचे पानांचे पावडर करून घराच्या कोपऱ्यात टाकल्यास झुरळं पळून जातात, असं सांगितलं जातं. कडुलिंबाचे पान हे कीटकनाशक म्हणून काम करते.
तुमच्या घरातील तेजपत्तादेखील घरातील झुरळं पळवण्यास कामी येऊ शकतो. तेजपत्ता हा झुरळांचा पहिल्या क्रमांकाच शत्रू मानला जातो. तेजपत्त्याच्या पानांचा चुरा करून ते कोपऱ्यात ठेवल्यास झुरलं घरातून पळून जातात असे सांगितले जाते.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)