
मोबाईल वापराचे वेळापत्रक बनवा : दिवसभरात मोबाईल वापरण्यासाठी विशिष्ट वेळापत्रक ठरवा. उदा. सकाळी 9 ते 9.30, दुपारी 1 ते 1.30. या वेळेव्यतिरिक्त मोबाईल वापरणे टाळा.

नोटीफिकेशन्स बंद करा : ज्या ॲप्सची आवश्यकता नाही, त्या ॲप्सचे नोटीफिकेशन्स बंद करा. नोटीफिकेशनमुळे मोबाईल तपासण्याची इच्छा होते, मात्र नोटीफिकेशन आले नाहीत तर ही सवय कमी होईल.

मोबाईल अंथरुणापासून दूर ठेवा : झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल दूर ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास मोबाईल पाहू नका. तसेच मोबाईल बेडरूममध्ये चार्जिंगला लावणे टाळा.

आवश्यक ॲप्स एका फोल्डरमध्ये ठेवा : जे ॲप्स तुम्हाला वारंवार तपासावे लागतात (उदा. सोशल मीडिया), ते होम स्क्रीनवरून काढून एका फोल्डरमध्ये ठेवा, ज्यामुळे ते तुम्हाला लगेच दिसणार नाहीत.

इतर कामे करा : मोबाईलमुळे वाया जाणारा वेळ सकारात्मक छंद किंवा कामांमध्ये लावा. उदा. पुस्तक वाचा, बाहेर फिरा, व्यायाम करा किंवा मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटा आणि बोला.