डावीकडे की उजवीकडे, रेल्वे धावताना रुळ कसा बदलते? अपघात का होत नाही? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!

रेल्वे चालवताना लोको पायलट सिग्नलकडे विशेष लक्ष ठेवतो. या सिग्नलामुळेच आता आपण पुढे जायचे आहे की नाही, हे लोको पायलटला समजतो.

| Updated on: May 17, 2026 | 6:26 PM
1 / 5
रेल्वने रोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. रेल्वेचा अपघात झाल्याच्या घटना फारच अपवादात्मक परिस्थितीत समोर येतात. रेल्वेचे चालक म्हणजेच लोको पायलटमुळे देशात रोज शेकडो रेल्वे कोणत्याही अपघाताविना धावतात.

2 / 5
रेल्वे रुळावरून धावते तेव्हा लोकोपायलट प्रामुख्याने तीन गोष्टींचे पालन करतो. पहिली बाब म्हणजे सिग्नल, दुसरी बाब म्हणजे ट्रॅक स्वीच म्हणजेच रेल्वेचा रुळ बदलणे आणि तिसरी बाब म्हणजे निर्धारित केलेले वेळापत्रक. या तिन्ही गोष्टींचे पालन करून रेल्वे रुळावरू धावत असते.

3 / 5
रेल्वे चालवताना लोको पायलट सिग्नलकडे विशेष लक्ष ठेवतो. या सिग्नलामुळेच आता आपण पुढे जायचे आहे की नाही, हे लोको पायलटला समजतो. याच सिग्नलच्या मदतीने लोको पायलट रेल्वेचा रुळही बदलतो. रेल्वेचा मार्ग काय असेल हे ठरवण्याचा अधिकार लोको पायलटला नसतो. रेल्वेचा मार्ग रेल्वे कंट्रोल रूमद्वारे ठरवला जातो.

4 / 5
रेल्वे चालवत असताना आपल्याला रुळ बदलायचा आहे, तो कधी बदलायचा आहे,  याची माहिती होम सिग्नलच्या मदतीने मिळते. याच होम सिग्नलच्या मदतीने लोको  पायलट रेल्वेचा ट्रॅक बदलतो. याच सिग्नलच्या मदतीने लोको पायलटला रेल्वेची गती ठरवता येते.

5 / 5
एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त रेल्वे रुळ असतील, त्या ठिकाणीहून 300 मीटरच्या अंतरावर हे होम सिग्नल लावले जाते. लोको पायलटला लगेच सिग्नल समजावे आणि योग्य निर्णय घेता यावा म्हणून हे सिग्नल 300 मीटरच्या अंतरावर लावलेले असते.

Follow Us