27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर

27 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये तुफान गाजलेला चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे. या चित्रपटाने तेव्हाही प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आताही तो ओटीटीवर तुफान गाजतोय.

| Updated on: Jun 22, 2026 | 2:46 PM
1 / 5
जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र या सर्वांमध्ये एक 27 वर्षे जुना चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होतोय. कौटुंबिक कथानकाचा हा चित्रपट सध्या जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे.

2 / 5
हा चित्रपट 1999 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती राजश्री बॅनरअंतर्गत झाली होती. यामध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली होती. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून 'हम साथ साथ है' आहे.

3 / 5
सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट सध्या जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. 'हम साथ साथ हैं' हा चित्रपट हॉटस्टारवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो.

4 / 5
या चित्रपटात सलमान खान, मोहनिश बहल, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, आलोक नाथ, निलम कोठारी, रिमा लागू यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की आजही त्याची चर्चा होते. जियो हॉटस्टारवर तो सध्या ट्रेंडिंगमध्ये असणं हा त्याचा स्पष्ट पुरावा आहे.

5 / 5
'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचा एकूण बजेट 17 कोटी रुपये होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने देशभरात 40 कोटी आणि जगभरात 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट यशस्वी ठरला होता. आजही टीव्हीवर हा चित्रपट अत्यंत आवडीने पाहिला जातो.

Follow Us