
हुंदाईने कॉम्पॅक्ट एसयूव्ही हुंदाई व्हेन्यूचा नवीन मॉडल लाँच केला. नवीन मॉडलच्या किमतीत २५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व्हेन्यू ई पेट्रोल व्हेरिएंटची शोरूम किंमत १२ लाख ५१ हजार रुपये आहे.

साऊथ कोरियन ऑटो कंपनीने व्हेन्यूच्या नवीन मॉडलला आधी पॉवरफूल डिझेल इंजीनसह सादर केले होते. न्यू व्हेन्यूत ११५ एचपी इंजीन पॉवर मिळेल. हे इंजीन आरडीई आणि ई २० कॉम्प्लिएंट आहे. डिझेल इंजीन व्हेरीएंटच्या किमतीत कंपनीने कोणताही बदल केलेला नाही.

नवीन व्हेन्यूच्या ११५ एचपी डिझेल इंजीनचा वापर हुंदाई क्रेटा आणि अल्कॅझरमध्ये होतो. याशिवाय Kia Sonet, Seltos आणि Carens लाही इंजीन पॉवर आहे. पेट्रोल इंजीनबाबत नव्या व्हेन्यूत मागील मॉडलप्रमाणे १.२ लीटर एनए आणि १ लीटर टर्बो पेट्रोल इंजीन ऑप्शन मिळेल.

नवीन एसयूव्हीमध्ये स्टार्ट स्टॉप फंक्शनसह इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर फिचरही दिलेला आहे. यामुळं इंधनाची बचत होईल. कार चांगले मायलेज देईल. वायरलेस अँड्राईड ऑटो आणि एप्पल कारप्ले, डिजीटल क्लस्टर, फ्रंट रीअर स्पीकर, एअरबॅग असे फीचर मिळतील.

हुंदई व्हेन्यू (पेट्रोल)चे १.० टर्बो एस आयएमटी, १.० टर्बो एसएक्स आयएमटीमध्ये २५ हजार रुपये किंमत वाढविण्यात आली आहे. हुंदाई व्हेन्यूचा नवीन मॉडल लाँच करण्यात आला आहे. या मॉडलची इंजीन ११५ एचपीचे आहे. पेट्रोल, डिझेल मॉडलमध्ये काही बदल नाही.