Chanakya Neeti : तुमच्याकडे पैसा आहे पण समाधान नाही? चाणक्य यांनी सांगितली त्रिसुत्री
आर्य चाणक्य हे एक महान विचारवतं आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांना आयुष्यात जे अनुभव आले, त्या आधारावर चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. चाणक्य नीती हा ग्रंथ विचारांचा अमूल्य असा ठेवा आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. सुखी संसार कसा करावा? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सोप्या उदाहरणासह सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जगात अशी अनेक माणसं असतात, त्यांच्याकडे पैसा तर भरपूर असतो, परंतु त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान नसतं, असे लोक त्यांच्या आयुष्यात कायम असमाधानी असतात. ते आपल्याकडे असलेल्या पैशांच्या जोरावर जगात समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे लोक आयुष्यात कायम असमाधानी राहतात. तर मग आयुष्यात समाधान कसं मिळवायचं? यासाठी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये एक त्रीसुत्री सांगितली आहे, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
अंहकार – चाणक्य म्हणतात जे लोक अंहकारी असतात, असे लोक आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही, त्यांना प्रत्येकवेळी त्यांचा अंहकार आडवा येतो. जे लोक अंहकारी असतात, त्यांच्याकडे कितीही पैसा असला तरी त्यांना कधीच समाधान लाभत नाही, कारण असे लोक आपण जे म्हणतो ते खरं अशा प्रवृत्तीचे असतात, त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून यांच्यामधला अंहकार दुखावला जातो आणि असे लोक कायम असमाधानी राहतात.
स्वार्थ – चाणक्य म्हणतात या जगात स्वार्थ हेच सर्व दु:खाचं मुळ कारण आहे, स्वार्थी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करते, आणि जेव्हा या व्यक्तीचा स्वार्थ साध्य होत नाही, तेव्हा अशी व्यक्ती दु:खी होते, त्यामुळे माणसाने स्वार्थी स्वभावाचा त्याग केला पाहिजे.
क्रोध – चाणक्य म्हणतात ज्या माणसाने रागावर नियंत्रण मिळवलं तो जगातील सर्वात सुखी आणि समाधानी व्यक्ती, मात्र त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या क्रोधावर नियंत्रण मिळवावं लागेल, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी व्हाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
