
मोहाली : पंजाबमधील मोहाली क्रिकेट स्टेडियमला या वर्ल्ड कपसाठी डावलण्यात आले आहे. यामुळे पंजाब क्रिकेट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबचे क्रिडा मंत्री गुरमीत सिंह यांनी बीसीसीआयवर स्टेडियम निवडतांना राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळ येथील प्रसिध्द स्टेडियम ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियमवर एकही मॅच न ठेवल्यामुळे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर चांगलेच नाराज झाले आहेत.

इंदौर : 2023 च्या वर्ल्डकप साठी यावेळी इंदौरची निवड करण्यात आलेली नाही. इंदौर स्टेडियमवर अनेक आंतरराष्ट्रीय मॅच खेळले जातात, तरीदेखील इंदौरची निवड करण्यात आलेली नाही. यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कदाचित त्यामुळेच काही खेळाडूंची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली नाही. हे खेळाडू टीम हॉटेलमधून परवानगी न घेता गायब व्हायचे. आयपीएल टीमने त्यांच्याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली होती.

या चार खेळाडूंची नाव अद्याप समोर आली नाहीत मात्र जेव्हा वेस्ट इंडिज साठीची टी-20 संघ जाहीर होईल त्यावेळी ते खेळाडू कोण हे समजू शकतं.

राजकोट : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे राजकोट स्टेडियममध्ये देखील एकही मॅच होणार नसल्याने चाहते नाराज आहेत.