
सध्या बॉलिवूडमध्ये व्हेकेशनचे वारे वाहत आहेत. त्यासाठी अनेक कलाकारांची पसंती ठरली आहे ती 'मालदीव'.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंसुद्धा आता एक छोटासा ब्रेक घेतला आहे. ती आता मालदीवला पोहचली आहे.

सध्या ती मालदीवमध्ये धमाल करत आहे. तिनं मालदीवचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मालदीवच्या सौंदर्याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत आहे.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.