
आचार्य चाणाक्य

दुसरं, पुरुषांनी कुत्र्याप्रमाणे कोणत्याही स्थितीत सतर्क राहणं गरजेचं आहे. कुटुंबाच्या कर्तव्यासाठी आणि शत्रूंपासून गुप्त कारवाया लक्षात घेऊन सतर्क राहणं गरजेचं आहे.

जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. परिश्रमाच्या जोरावर जितकं मिळेल त्यावर समाधानी राहणं गरजेचं आहे. कुत्र्यांना जितकं मिळतं त्यात ते समाधानी असतात. हा गुण पुरुषांमध्ये असेल तर यश मिळतं.

कुत्रा साहसी आणि निर्भय असतो. त्याचप्रमाणे पुरुषाने निर्भय राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि पत्नीच्या मागे खंभीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.

पुरुषांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडल्या पाहीजेत. यामुळे कौटुंबिक जीवन सुखमय होते. पत्नीला मानसिक आणि शारीरिक दृष्टीने समाधानी करण्याची जबाबदारी पतीने पार पाडली पाहीजे. असे गुण असलेले पुरुष पत्नींना सर्वात जास्त आवडतात.