
अंड्यात प्रोटीन आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते. त्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. रोज एक महिने खाल्ल्यास शरीरात मोठा बदल दिसतो. शरीराला त्याचे अनेक फायदे होतात.

अंड्यात सर्वाधिक प्रथिने असतात. प्रथिनांचा तो एक चांगला स्त्रोत मानल्या जातो. जर तुम्ही रोज अंडे खाल्ले तर शरीरात ताकद, ऊर्जा वाढते. शरीर मजबूत होते. शरीरात अनेक बदल दिसून येतात.

अंड्यातील कोलीन मेंदूसाठी चांगले मानल्या जाते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. एकाग्रता वाढीसाठी फायदा होतो. तर मूड पण चांगला होतो. अंड्यात ल्यूटिन आणि जीएक्सॅंथिन नावाचे तत्व असते. त्यामुळे डोळ्यांची नजर सुधारते आणि वाढत्या वयात नजर चांगली होण्यास मदत होते.

योग्य प्रमाणात अंडे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढते. तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. हे हृदयाला चांगले असते. अंड्यातील व्हिटामिन B12 आणि लोह यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दिवसभरातील थकवा दूर पळतो.

अंडे खाल्ल्याने भूख लागत नाही. कारण हे हाय प्रोटीन फूड आहे. यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. वजन नियंत्रित राहते. अंड्यातील बायोटिन आणि व्हिटामिन D त्वचेसाठी आणि केसांना पोषण देते. अंड्याच्या नियमीत सेवनाने त्वचा आणि केस चमकदार होतात.

रोज अंडे खाणे चांगले असले तरी ते एका योग्य प्रमाणात खाणे चांगले आहे. दिवसभरात एक किंवा दोन उकडलेले अंडे खाणे हा चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त अंडे खाणे चांगले मानल्या जात नाही. एका योग्य प्रमाणात अंडे खाणे हे फायद्याचे मानले जाते.