दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करताय? मग मध्यप्रदेशातील ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

| Updated on: Oct 28, 2021 | 9:06 AM

जर तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांनमध्ये बाहेर फिरण्याचे पर्याय शोधत असाल तर मध्यप्रदेश हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. मध्य प्रदेश हे निसर्गाच्या सानिध्यात असणारे राज्य आहे. ज्याच्या आजूबाजूला बर्फाच्या पर्वतरांगा नसल्या तरी इथले सौंदर्य सर्वांचे मन प्रसन्न करणारे आहे. मध्य प्रदेशमध्ये, तुम्ही अनेक ऐतिहासिक भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात मध्यप्रदेशमध्ये तुम्ही कोणत्या ठिकानांना भेट देऊ शकता.

1 / 6

2 / 6
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ हे देखील पाहण्यासाठी खूप खास आहे. डोगरांच्या कुशीत वसलेले हे शहर भौगोलिक दृष्टिकोनातूनही अतिशय सुरक्षित शहर मानले जाते. येथील हवामान अतिशय आल्हाददायक आहे कारण येथे फारशी उष्ण किंवा थंडही नाही.

3 / 6
 भीमबेटका रॉक शेल्टरला मध्यप्रदेशाची शान म्हणू शकतो. जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथील लेणी आणि चित्रे अतिशय प्रेक्षणीय आहेत. येथील सर्वात जुनी चित्रकला 12 हजार वर्षे जुनी मानली जाते. पर्यटनासाठी हे सर्वात वेगळे आणि खास ठिकाण म्हणता येईल.

4 / 6
पचमढी हे मध्य प्रदेशातील हिल स्टेशन आहे. हे शहर होशंगाबाद जिल्ह्यात आहे. या ठिकाणचे सौंदर्य मनामध्ये घर करुन जाते. आजूबाजूला हिरवीगार जंगले, डोंगरांच्या उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे सर्व दृश्य अप्रतिम आहे.

5 / 6
 ग्वाल्हेरबद्दल बोलायचे तर ते एक ऐतिहासिक शहर देखील आहे. येथील स्मारके, सुंदर राजवाडे आणि मंदिरे तुम्हाला त्याकडे आकर्षित करण्याचे काम करतील. ग्वाल्हेरचा किल्ला, जय विलास महाल आणि सूर्य मंदिराचे सौंदर्य मनमोहणारे आहे.

6 / 6
उज्जैन हे मध्य प्रदेशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उज्जैन शहर हे पवित्र शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला शिवनगरी म्हणतात. या ठिकाणचे सौंदर्य म्हणजे येथील मंदिरे, जी जवळपास प्रत्येक गल्लीत आहेत. येथे असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे 12 मध्ये एकदा कुंभमेळा भरतो.