
गणेशोत्सवाला दहा दिवस उलटले असून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. आज पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन झालं आहे.

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती मंडपातच या गणयाराचं विसर्जन झालं.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.