अधिक मासाच्या निमित्ताने सून आणि मुलीला भेट दिल्या चक्क चांदीच्या चपला, किंमती किती ?

अधिक मासाच्या निमित्ताने मुलीला माहेरी बोलावून तिला चांदीचे पैंजण किंवा जोडवे देण्याची परंपरा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील बारणे कुटुंबाने ही प्रथा अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 6:32 PM
1 / 5
 अधिक मासाच्या निमित्ताने मुलींना तसेच जावयाला जेवायला बोलावून त्यांना सोन्या-चांदीचा दागिना भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. अनेकदा मुलींना चांदीचे पैंजण किंवा जोडवे देण्याची परंपरा असते. मात्र, बारणे कुटुंबियांनी या प्रथेला छेद दिला आहे.

2 / 5
 पिंपरी-चिंचवड येथील बारणे कुटुंबियांनी आपल्या मुलीला आणि सूनेला अधिक मासाच्या निमित्ताने घरी गोडधोड खायला घालत त्यांना चांदीचे दागिने भेट दिले आहेत. मात्र, ही भेट म्हणजे चक्क चांदीची भरीव पादत्राणे आहेत.

3 / 5
 पिंपरी-चिंचवडच्या संतोषनगर भागातील सचिन बारणे कुटुंबीयांनी अधिक मासानिमित्त तीन जोडी खास चांदीची पादत्राणे तयार करून घेतली आहेत. ही पादत्राणे त्यांनी त्यांची मुलगी आणि सूनेला भेट दिली आहेत.

4 / 5
 कोकणे चौकातील ज्वेलर्सकडून विशेष ऑर्डर देऊन बनविण्यात आलेल्या प्रत्येक चांदीच्या चपलांच्या जोडीची किंमत सुमारे एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

5 / 5
 मुलगी आणि सून या दोघीही आमच्यासाठी लक्ष्मीस्वरूप असल्याने त्यांचा योग्य सन्मान करण्याच्या भावनेतून ही अनोखी भेट दिल्याचे बारणे कुटुंबीयांनी सांगितले. या आगळ्यावेगळ्या भेटीची सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Follow Us