Gautam Gambhir : आता गौतम गंभीरचा मित्र परिवार श्रेयस अय्यरला जबाबदार धरेल पण ड्रेसिंग रुममधल्या..हेड कोचना धरलं धारेवर

Gautam Gambhir : आयर्लंडकडून T20 मालिकेत 2-0 ने पराभव झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर टीकेची एकच झोड उठली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांपूर्वी टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला हे देखील लोक विसरुन गेले आहेत. आयर्लंडकडून हार झाली, त्या बद्दल गौतम गंभीर यांच्या रणनितीला जबाबदार धरलं जात आहे.

| Updated on: Jun 30, 2026 | 8:17 AM
1 / 5
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसाठी टी20 सीरीजची खूप खराब सुरुवात झाली आहे. फलंदाज म्हणून स्वत:ही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यात मिळून त्याने फक्त 13 धावा केल्या. पहिल्या सामन्यात 3, दुसऱ्या सामन्यात 10 धावांवर बाद झाला.

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसाठी टी20 सीरीजची खूप खराब सुरुवात झाली आहे. फलंदाज म्हणून स्वत:ही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यात मिळून त्याने फक्त 13 धावा केल्या. पहिल्या सामन्यात 3, दुसऱ्या सामन्यात 10 धावांवर बाद झाला.

2 / 5

आयर्लंडकडून झालेल्या या पराभवासाठी गौतम गंभीर यांचे हितचिंतक आता आरोपांची दिशा बदलून या सगळ्याचं खापर नवीन कर्णधार श्रेयस अय्यरवर फोडतील असं मनोज तिवारी म्हणाले. भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी थेट गौतम गंभीरचं नाव घेतलं नाही पण ते हे सर्व गंभीर बद्दल बोलतायत हे स्पष्ट होतं.

3 / 5

गौतम गंभीर यांचा जास्तीत जास्त टीममध्ये ऑलराऊंडर खेळवण्यावर भर असतो. हे टीम इंडियाच्या घसरणीचं एक प्रमुख कारण आहे. सर्वच फॉर्मेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी ढासळते त्यामागे हेच मुख्य कारण आहे, असं विश्लेषण मनोज तिवारी यांनी केलं.

4 / 5

भारत दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप जिंकेलही. पण आयर्लंडकडून टी20 मालिकेत झालेल्या पराभवाचं काय?. यासाठी कोण जबाबदार आहे?. आता पीआर एजन्सीज आणि डिसिजन मेकर म्हणजे निर्णय घेणाऱ्याचे मित्र या सगळ्याच खापर श्रेयस अय्यरवर फोडतील असं मनोज तिवारी म्हणाले.

5 / 5

फलंदाज म्हणून फक्त ही श्रेयस अय्यरची चूक नाहीय, तर अन्य फलंदाजांची सुद्धा तितकीच चूक आहे, जे परफॉर्म करु शकले नाहीत. मालिका पराभवासाठी श्रेयसला जबाबदार धरलं जाईल. पण ड्रेसिंग रुममधला जो मोठा प्रश्न आहे, त्या बद्दल कोणी बोलत नाहीय. आता पाणी डोक्यावरुन गेलय, त्यावर बोललं पाहिजे असं मनोज तिवारी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us