AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli News : लोकलची धडक आहे असं सर्वांना वाटलं, पण..मोबाइल, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती, डोंबिवलीतली घटना

Dombivli News : डोंबिवलीत एक प्रकरण घडलं. त्याच्या चौकशीतून समोर आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. सुरुवातीला मुलीला लोकलने धडक दिली असचं सर्वांना वाटलं.

Dombivli News : लोकलची धडक आहे असं सर्वांना वाटलं, पण..मोबाइल, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती, डोंबिवलीतली घटना
Mumbai Local
| Updated on: Aug 15, 2026 | 5:56 PM
Share

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत एका अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटला. पण तपासात तरुणीने स्वत:च जीवन संपवून घेतल्याचं समोर आलं. 2 ऑगस्टला कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. आता या तरुणीच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टममधून अल्पवयीन तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झालं आहे. रेल्वे पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आलाय. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीची राज पकड याच्याशी ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री आणि प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासात समोर आली.

तरुणीच्या मोबाईलमधील चॅटिंग तपासल्यानंतर पोलिसांना राज पकडपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. चौकशीनंतर राजला अटक करण्यात आली. राज पकडला कल्याण न्यायालयात हजर केल्यानंतर 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डोंबिवली रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

भटक्या कुत्र्याकडून 19 जणांना चावा

वर्ध्यात भटक्या कुत्र्याची दहशत आहे. भटक्या कुत्र्याने तब्बल 19 जणांना चावा घेतला. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. बसस्थानकासमोरील परिसरात कुत्र्याने काही जणांना चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. 18 जणांवर उपचार करून सुट्टी देण्यात आली. एका वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. कुत्र्यांची दहशत रोखण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे.

रिल्सला लाईक आणि कमेंट वादात एकावर कोयत्याने वार

डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राडा. रिल्सला लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादात एकावर कोयत्याने वार. 8 ते 10 जणांच्या ग्रुपमध्ये दोन मुलींचाही समावेश. कॅफेमध्ये तोडफोड आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी PSI संदीप कदम यांना 29 जून 2026 रोजी निलंबित करण्यात आले होते. घटनेची सत्यता तपासल्यानंतर PSI संदीप कदम यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. याच ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत कोयता गँगने घातला धुमाकूळ. कॅफेमध्ये झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यामुळे पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...