AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्या घरात तुफान राडा, फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्या घरात तुफान राडा, फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं प्रकरण काय?
Omraje Nimbalkar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 6:01 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे चांगलेच चर्चेमध्ये आहेत, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेमध्ये पडलेल्या फुटीनंतर दुसरा मोठा धक्का होता. दरम्यान ज्या सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता.  सुरुवातीला ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? याबाबत शंका होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढलं होतं, मात्र त्यानंतर अखेर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर पूर्ण झालं.

आता धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात जोरदार राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन कार्यकर्ते आपसात भिडले, त्यांच्यामध्ये यावेळी फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ओमराजे निंबाळकर यांच्या घरी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीनंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून वाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. अखेर ओमराजे यांचे बंधू डॉ. जय राजे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. दरम्यान या दोन कार्यकर्त्यांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणांवरून झाला हे अजून अस्पष्ट नाही.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा दौरा 

विशेष म्हणजे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडला आहे, ओमराजे निंबाळकर यांच्या घरीच हे दोन कार्यकर्ते आपसात भिडले, जोरदार वाद झाला, या प्रकाराची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!