
प्रोन पोझिशनिंग - या व्यायामामध्ये आपल्याला पोटावर झोपावे लागेल आणि त्यानंतर आपल्या पोटानुसार आपल्याला खालच्या ओटीपोटावर उशी ठेवावी लागेल. आपल्या पोटावर अधइक जोर पडणार नाही इतक्या खालीही उशी ठेवू नका. एक उशी छातीच्या वरच्या भागावर ठेवा आणि झोपा.

चेस्ट वॉल स्ट्रेचिंग - चेस्ट वॉल स्ट्रेचिंग एक्सरसाइजही ऑक्सिजन लेवल वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. ही एक्सरसाईज आपण उभे राहून आणि आपले हात 90 अंशापर्यंत पसरवून देखील करू शकता.

90/90 ब्रिदिंग एक्सरसाईज - या व्यायामामध्ये आपल्याला जमिनीवर झोपावे लागेल आणि त्यानंतर आपले पाय खुर्चीवर ठेवू शकता किंवा भिंतीचा आधार घेऊ शकता. यानंतर, एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवा आणि पोट फुगवा. यानंतर, आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे.

क्वाड्रोपॅड ब्रिदिंग - आपण फोटोत दिल्याप्रमाणे पोझिशनमध्ये या. यानंतर, संपूर्ण श्वास घ्या आणि त्या स्थितीत 3 सेकंद थांबा आणि सामान्य स्थितीत परत येताना पुन्हा श्वास घ्या. हे 10 वेळा करा. लक्षात ठेवा की ही एक्सरसाईज प्रथम एखाद्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली करा.