IND vs NZ : पहिल्या वनडेत अंशुल कंबोजने 46 निर्धाव चेंडू टाकले, आज अजून एका भारतीय बॉलरचं बेस्ट प्रदर्शन, त्याने 47 डॉट बॉल टाकले
IND vs NZ : टीम इंडिया न्यूझीलंड मध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. भारताचे युवा गोलंदाज कमालीची बॉलिंग करतायत. पहिला वनडे सामना अंशुल कंबोजने गाजवला होता.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचे युवा गोलंदाज आग ओकणारी बॉलिंग करत आहेत. पहिल्या वनडे मध्ये अंशुल कंबोजने 46 निर्धाव चेंडू टाकले होते. आता अजून एका बॉलरने त्यापुढे जात 47 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
वेलिंगटनमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने भेदक गोलंदाजी केली. न्यूझीलंडचा डाव अवघ्या 134 धावांवर गुंडाळला. 47 ओव्हरच्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा डाव अवघ्या 41 ओव्हर्समध्ये आटोपला. गुरनूर बराडने या मॅचमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं. वनडे करिअरमधील बेस्ट प्रदर्शन केलं. (Photo PTI)
गुरनूर बराडने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 60 चेंडू टाकले. 60 पैकी 47 चेंडू निर्धाव होते. म्हणजे त्यावर एक धावही निघाली नाही. 47 डॉट बॉल त्याने टाकले. (Photo PTI)
10 ओव्हरमध्ये 47 डॉट बॉल टाकणाऱ्या गुरनूर बराडने वेलिंग्टन वनडेमध्ये 30 रन्स देऊन चार विकेट काढले. वनडे करिअरमधील त्याचं हे बेस्ट प्रदर्शन आहे. वनडेमध्ये पहिल्यांदा त्याने चार विकेट काढले. (Photo PTI)
गुरनूर बराडचं याआधी वनडे मध्ये 27 रन्सवर 3 विकेट सर्वोत्तम प्रदर्शन होतं. याचवर्षी धर्मशाळा वनडे मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हे प्रदर्शन केलं होतं. न्यूझीलंड मधील गोलंदाजीला पोषक वातावरणात त्याने भेदक गोलंदाजी केली. गुरनूर बराड आतापर्यंत 11 वनडे सामने खेळला आहे. वेलिंगटनमधील चार विकेट जोडल्यानंतर गुरनूर बराडच्या नावावर एकूण 21 विकेट झाले आहेत. (Photo PTI)