IMD Rain Alert : धो धो पाऊस, 22 राज्यात हवामान विभागाचा अलर्ट, ताशी 70 किमी वेगाने वारे, थेट..
IMD Rain Alert : राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच हवामान विभागाने मोठा इशारा दिला. देशातील जवळपास राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. परतीचा पाऊस चांगला कोसळण्याचा अंदाज आहे.

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस चांगला होण्याचा अंदाज होता. गेल्या दोन दिवसात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. त्यातच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.
9 ऑक्टोबर 2026 रोजी 22 राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. ताशी 70 किलोमीटरपर्यंत वारे वाहतील.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, आसाम, मिझोराम, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश या राज्यात पावसाचा अंदाज आहे. एकूण 22 राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला.
देशातया बदलत्या हवामानाची विविध प्रणारी सक्रिय झाली. उत्तराखंड हिमाचल प्रदेश परिसरात खालच्या थरात चक्रीवादळासारखी स्थिती तयार झाली. काही भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली.
काही राज्यात पुढील 3 दिवस पावसाची स्थिती आहे. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने मोठा दिलासा मिळताना दिसतोय. काही भागात तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातही काही भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.