Cyclone alert : आता मोठं संकट, भयानक चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी, अतिमुसळधार पावसासह..
एका महिन्यात तीन चक्रीवादळ धडकताना दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. देशातील अनेक राज्य या चक्रीवादळामुळे संकटात आहेत. भारतीय हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला.

महिन्याभरात तिसऱ्या मोठ्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या चक्रीवादळाला अक्कान नाव देण्यात आले. जोरदार वेगाने वारे आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
IMD च्या अंदाजानुसार, सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी हे वादळ बंगालच्या खाडीत पोहोचले. अंदमान व्दीप पोर्ट ब्लेअरपासून 700 किलोमीटर पश्चिम दक्षिण तामिळनाडू चेन्नई 860 दूर स्थिर आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या खाडीतून हे चक्रीवादळ पुढे सरकताना दिसत आहे. यादरम्यान देशाच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
उत्तर हिंद महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाचे नाव अक्कान इराणने ठेवले आहे. भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळावर बारीक नजर ठेवली आहे. समुद्रकिनाऱ्यावर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात हवामानात मोठा बदल होऊ शकते. 36तासात अक्कान चक्रीवादळ राैद्र रूप धारण करू शकते.