AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपकेंना साथ देणारे सोनम वांगचुक चहुबाजुंनी कोंडीत, आता थेट 60 दिवस…

अभिजीत दिपकेंना साथ देणारे सोनम वांगचुक चहुबाजुंनी कोंडीत सापडले आहेत. त्यांना थेट 60 दिवस नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

अभिजीत दिपकेंना साथ देणारे सोनम वांगचुक चहुबाजुंनी कोंडीत, आता थेट 60 दिवस...
Sonam wangchukImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 2:48 PM
Share

सामाजिक कार्यकर्ते आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अभिजीत दिपकेंना साथ देणार्‍या सोनम वांगचुक यांना 60 दिवस नजरकैदेत ठेवलं जाणार आहे. त्यांना या कालावधीत 60 दिवस कोणत्याही रॅलीत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जाहीर केले आहेत. प्रशासनाच्या निर्णयाने सोनम वांगचुक हे चहुबाजुंनी कोंडीत सापडले आहेत. तर लडाख नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने पोलिसांचं परिपत्रक जारी करत वांगचुक यांच्यावर निर्बंध घातले आहेत. वांगचुक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 चा वापर करण्यात आला आहे. त्यांना आता 60 दिवस नजरकैदेत ठेवलं जाणार आहे. लडाख नगरपरिषदेसाठी निवडणूक ही 4 डिसेंबर रोजी होणार आहे. परंतु सोनम वांगचुक आणि इतर स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीच्या वेळेला विरोध केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2019 साली लडाखला केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आल्यानंतर यावर्षी लडाखमध्ये पहिली निवडणूक होणार आहे. वांगचुक आणि इतर संघटनांचं म्हणणं आहे की, डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये प्रचंड थंडी असते. या काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कामगार लडाख सोडून इतर भागात जातात. त्यामुळे हे लोक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मागणीवर लडाखचे मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी मतदान केंद्रावर हिटरची व्यवस्था केली जाईल. वृद्धांसाठी एक वेगळी रांगेची सोय करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.

लडाखमध्ये शाळा 15-16 डिसेंबर रोजी खुल्या होतात. या काळात मुले शाळेत जाऊ शकतात. तर ज्येष्ठ नागरिकांना मतदानांसाठी घराबाहेर पडण्यात कोणताही अडचण येणार नाही. वेळेवर नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणुका झाल्यातर जानेवारी ते मार्च महिन्यात पुढील आर्थिक वर्षांचं बजेट देखील सादर करता येईल, असे कुंद्रा यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशावर सोनम वांगचुक म्हणाले, मला नजरकैदेत ठेवलं आहे. 20 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी मला घेरलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, मी नजरकैदेत आहे. माझ्या घराच्या चहुबाजूंनी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मला घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. मी तिखट प्रश्न विचारल्याने मला नजरकैदेत ठेवलं’.

Follow Us
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव