IND vs NZ: चक्क विराटने स्लीपमध्ये सोडला सोपा कॅच, गंभीर संतापला, Video एकदा पाहाच
IND vs NZ ODI 5th Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडली आहे.

IND vs NZ ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल झालेली दिसली. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड सगळेच फेल झाले. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कशातच भारतीय संघाने कौतुकस्पद कामगिरी केलेली नाही. फिल्डिंगचा बादशाह मानला जाणारा विराट कोहली जेव्हा कॅच सोडतो तेव्हा मात्र सर्वच आश्चर्यचकित होतात. असं काहीसे आजही घडलेले पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
२१० धावांचा माफक आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच जोरदार आक्रमण करत न्यूझीलंडचे फलंदाज लवकर बाद झाले. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रभावी बॉलिंग केली. न्यूझीलंडचे सुरुवातीचे खेळाडू बाद करुन या सामन्यात भारतीय संघाचे पुनरागमन होणार होते. पण इथेच विराट कोहलीने एक मोठी चूक केली. त्यानं हा महत्त्वाचा कॅच सोडला.
Virat drops one in the slips!
#INDvNZ #ViratKohli https://t.co/Yi30iEKRFL
— Siddhesh💛 (@TheSiddheshView) November 15, 2026
कॅप्टन श्रेयस अय्यरने आक्रमक बॉलिंग लावली अन् अर्शदीप अन् मोहम्मद सिराज यांचे 8 ओव्हर पहिल्या स्पेलमध्ये पूर्ण केलं. विकेट्सची गरज असताना श्रेयसने स्लिपला दोन स्टार खेळाडू लावले. यातील एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरा रोहित शर्मा… रोहितने आधीच एक कॅच सोडला असताना विराटने फॉक्सक्राईफ्ट याचा एक सिंपल कॅच सोडला. त्यावरून गौतम गंभीर ड्रेसिंग रुममध्ये नाराज दिसला.
भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात भारतीय फलंदाजांना विशेष कामगिरी करता आलेली नाही. पहिला वनडे सामना डीएलएस पद्धतीने भारतीय संघाने जिंकला. तर दुसरा वनडे सामना हा भारतीय संघाने जिंकला तोही डीएलएस पद्धतीनेच. तिसरा वनडे सामना हा पावासमुळे होऊच शकला नाही. चौथा वनडे सामना हा न्यूझीलंडच्या संघाने जिंकला. भारतीय संघ २-१ ने मालिकेत पुढे आहे. आता पाचवा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर मालिका जिंकेल. पण जर सामना गमावला तर मात्र मालिका बरोबरीत सुटेल.
