AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: रामायण आहे की रावणायण? यशच्या भूमिकेवरून मोठा वाद; अखेर अनुपम खेर यांनी सांगितलं कारण, म्हणाले..

Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात रामापेक्षा अधिक शक्तिशाली रावणाला दाखवल्याची टीका अनेकांकडून होत आहे. यावर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ramayana: रामायण आहे की रावणायण? यशच्या भूमिकेवरून मोठा वाद; अखेर अनुपम खेर यांनी सांगितलं कारण, म्हणाले..
अनुपम खेर, यशImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 2:06 PM
Share

Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, तर अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील यशच्या रावणाच्या भूमिकेचं अनेकांकडून कौतुक होत आहे. मात्र, काही प्रेक्षकांनी रावणाला श्रीरामांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि प्रभावी दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘रामायण’ आहे की ‘रावणायण’, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या वादावर आपली भूमिका मांडली आहे. रावणाला अधिक शक्तिशाली दाखवण्यामागे दिग्दर्शक नितेश तिवारी यांची खास रणनीती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रावणाला एवढं शक्तिशाली का दाखवलं?

अनुपम खेर यांनी ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर भाष्य केलं. ते म्हणाले की, नितेश तिवारी यांनी सुरुवातीपासूनच ‘रामायण’ दोन भागांत बनवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पहिल्या भागात खलनायक म्हणजेच रावणाला अत्यंत शक्तिशाली आणि भव्य स्वरूपात दाखवणं गरजेचं होतं. पुढे त्यांनी सांगितलं की, जेव्हा खलनायक खूप शक्तिशाली असतो, तेव्हा त्याच्यावर विजय मिळवण्याचं महत्त्वही वाढतं. दुसऱ्या भागात जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा पराभव करतील, तेव्हा चांगल्याचा वाईटावर झालेला विजय अधिक प्रभावी वाटेल. यासाठीच रावणाचं पात्र अधिक ताकदवान दाखवण्यात आलं आहे.

‘शोले’, ‘कर्मा’ चित्रपटांचं दिलं उदाहरण

आपलं म्हणणं स्पष्ट करताना अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शोले’ आणि ‘कर्मा’ या चित्रपटांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, हिंदी चित्रपटांमध्ये खलनायक किती भयानक आणि शक्तिशाली आहे, हे आधी प्रस्थापित केलं जातं. त्यानंतर जेव्हा नायक त्याचा पराभव करतो, तेव्हा प्रेक्षकांना मोठा आनंद मिळतो. ‘रामायण’मध्येही निर्मात्यांनी अशीच रणनीती वापरली आहे. रावणाचं पात्र श्रीरामांपेक्षा अधिक प्रभावी वाटत असल्याच्या चर्चेवर अनुपम खेर यांनी असहमती दर्शवली. त्यांच्या मते, रावणाचं व्यक्तिमत्त्व भव्य आणि नाट्यमय आहे, तर श्रीरामांचं व्यक्तिमत्त्व वेगळ्या पद्धतीने उलगडत जातं.

ते म्हणाले की, चित्रपटाच्या पुढील भागात श्रीरामांचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर येतील. वालीचा वध, मेघनादाशी सामना अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमधून त्यांचं सामर्थ्य दिसेल. आपण संपूर्ण कथा एकाच वेळी समजून घेण्यासाठी घाई करत आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

जटायू-राम प्रसंगाचा केला उल्लेख

या चित्रपटात अनुपम खेर यांनी जटायूला आवाज दिला आहे. जटायू आणि श्रीराम यांच्यातील भावनिक प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, जटायूच्या निधनानंतर श्रीराम भावूक होऊन रडतात. या प्रसंगातून श्रीरामांचं माणुसकीचं आणि भावनिक रूप प्रेक्षकांसमोर येतं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेची खोली समजून घेण्यासाठी संपूर्ण कथा पाहणं गरजेचं आहे.

Follow Us
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?