Maharashtra Weather : वारं फिरलं, विदर्भात पावसाचा अलर्ट, महाराष्ट्राचे टेन्शन वाढले, उत्तरेकडून थंडीची..
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात हवामानात बदल होईल. थंडी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच काही भागात पावसाचा इशारा देखील देण्यात आला.

राज्यात गुलाबी थंडी जाणून लागली आहे. हुडहुडी वाढल्याचे चित्र आहे. विदर्भातील काही भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज 22 नोव्हेंबर 2026 रोजी हवामानात चढउतार बघायला मिळेल.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळले आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 8 अंश सेल्सिअस तापमाना नोंदवले गेले. नाशिक येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अक्कान चक्रीवादळामुळे विदर्भातील काही भागात पाऊस होईल. यासोबतच मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल. आज हवामानात चढउतार बघायला मिळेल.राज्यात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला. समाधानकारक पाऊस यंदा झाला नाही.
त्यातच नोव्हेंबर महिन्यात काही भागात पाऊस होताना दिसत आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जार करण्यात आला. सतत हवामानात बदल होत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवसात हवामानात मोठे बदल बघायला मिळतील. तापमानात मोठी घट होताना दिसेल.