India Squad for Sri Lanka Tests : विकेट घेतल्या, धावा बनवल्या तरीही सिलेक्शन नाही, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम निवडताना भारताच्या 4 खेळाडूंवर अन्याय

India Squad for Sri Lanka Tests : श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. पण टीममध्ये अशा चार खेळाडूंना संधी मिळालेली नाही, ज्यांचा त्या जागेवर हक्क होता.

| Updated on: Jul 28, 2026 | 4:07 PM
1 / 5
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या 15 सदस्यीय संघात अशा खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीचं प्रदर्शन केलय. ते 4 खेळाडू कोण आहेत, ज्यांना स्थान मिळालेलं नाही, त्यांच्याबद्दल जाणून घ्या.(PC-PTI)

2 / 5
या खेळाडूंमध्ये पहिलं नाव आकिब नबीचं आहे. त्याने मागच्या रणजी सीजनमध्ये 60 विकेट घेतले होते. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली. पण कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आलेला. पण संधी न देताच त्याला बाहेर काढण्यात आलं. (PC-PTI)

3 / 5
मोहम्मद शमीकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आलं आहे. शमीचा फॉर्म चांगला आहे. पण त्याच्या फिटनेसचा मुद्दा आहे. मोहम्मद शमीचं आता टीममध्ये सिलेक्शन होणं कठीण आहे. (PC-PTI)

4 / 5
सरफराज खानला सुद्धा टेस्ट टीममध्ये संधी मिळाली नाही. टीम इंडियासाठी तो 6 टेस्ट खेळलाय. त्यात त्याने 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. सरफराजने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. न्यूझीलंड विरुद्ध 2024 मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला. तेव्हापासून तो बाहेर आहे. अजूनपर्यंत त्याचं सिलेक्शन झालेलं नाही. (PC-PTI)

5 / 5
बंगालचा ऑलराऊंडर शाहबाज अहमदला रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करुनही संघात स्थान मिळालेलं नाही. त्याने बंगालकडून खेळताना 8 सामन्यात 39 विकेट घेतलेत. त्याशिवाय 40 च्या सरासरीने 434 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लासमध्ये त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त आहे. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us