AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanha Pola Accident : आकाश पाळण्यात बसली, चामडीसहीत केस झाले वेगळे, यवतमाळच्या महिलेसोबत अंगाचा थरकाप उडवणारी घटना

आकाश पाळण्यात बसताना इतका मोठा अपघात होऊ शकतो, याची कल्पनाही कोणी केली नसेल. नेमकं काय घडलं आणि महिलेच्या केसांसोबत डोक्याची चामडी कशी निघाली?

Tanha Pola Accident : आकाश पाळण्यात बसली, चामडीसहीत केस झाले वेगळे, यवतमाळच्या महिलेसोबत अंगाचा थरकाप उडवणारी घटना
Tanha Pola AccidentImage Credit source: AI image
| Updated on: Sep 12, 2026 | 8:03 PM
Share

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : तान्हा पोळ्यानिमित्त महागाव फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित यात्रेत शुक्रवारी दुपारी थरारक दुर्घटना घडली. आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह डोक्याची चामडी निघाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने यात्रास्थळी एकच खळबळ उडाली. फुलसावंगी येथील बाली मारोती टाळीकोटे (वय 25) या आकाश पाळण्यात बसल्या होत्या. दुपारी सुमारे ३ वाजता पाळणा सुरू असताना अचानक त्यांचे केस बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटना लक्षात येताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबविला. जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढून त्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आनंदासाठी जमले होते, पण क्षणार्धात भीतीचं वातावरण

तान्हा पोळ्यानिमित्त यात्रेत मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक जमले होते. मात्र, आकाश पाळण्यात घडलेल्या या दुर्घटनेने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांपूर्वी आनंदाने सुरू असलेल्या यात्रेत अचानक आरडाओरड आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर यात्रेतील मनोरंजनाच्या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आकाश पाळण्याची देखभाल, बेरिंगसह यंत्रणेची तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Parvez Lala (@lala_parvez_)

व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून चिंता

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काहींनी केस ओढले गेले तरी किती वेदना होतात, मग या महिलेला किती त्रास झाला असेल, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी महिलांनी केसांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

एका नेटकऱ्याने स्वतःचा अनुभव सांगत मशीनमध्ये केस अडकल्याची आठवण करून दिली. तर काहींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमी महिला लवकर बरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यात्रेत आनंद घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर अशी वेळ आल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली