आयटी इंजिनिअर व्यायामात मग्न, भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना!
विरेंद्र द्विवेदी हे पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ व्यायाम करत होते. याच वेळी मागून एक भरधाव कार आली. या कारने त्यांना थेट धडक दिली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ज्या काराने त्यांना उडवलं, त्याच कारमधून नंतर द्विवेदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune Accident : पुणे हे मोठ्या घडामोडींचं शहर आहे. या शहरातील राजकारण नेहमीच चर्चेत असतं. हे शहर आयटी हब म्हणून नावारुपाला आहे. त्यामुळे इथं उच्चशिक्षित तरुण, तरुणी नोकरीसाठी येतात. अशाच एका सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी धावत असताना त्याला भरधाव कारने थेट धडक दिली आहे. ही धडक एवढ्या जोरात होती की यातच त्याचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव विरेंद्र द्विवेदी असे आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणात चतुःशृंगी पोलीस तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार विरेंद्र द्विवेदी हे पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ व्यायाम करत होते. याच वेळी मागून एक भरधाव कार आली. या कारने त्यांना थेट धडक दिली. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ज्या काराने त्यांना उडवलं, त्याच कारमधून नंतर द्विवेदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित कार पुण्यातील खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचा माहिती समोर आली आहे.
‘या’ नावावर नोंदणीकृत अपघातग्रस्त कार
तपासादरम्यान अपघातग्रस्त कारबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातात सहभागी असलेली कार ही ‘ब्लूरेज डेव्हलपर्स’ या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तसेच या गाडीचा अधिकृत पत्ता ‘अबिल हाऊस’ येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना घडताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. या प्रकरणात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईशान शेठिया या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. इशान हा बीबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचे वडील ब्लू रेस कंपनीत लीगल अॅडव्हाजर म्हणून काम करतात. इशाह हॉस्टलमध्ये राहतो आज सकाळी साहित्य आणायला तो बाहेर पडला होता. अपघात झाल्यावर हा स्वतः च द्विवेदी यांना हॉस्पिटलला घेवून गेला होता.
