
भारत-अमेरिका व्यापार करार : भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "मला तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप आदर आहे. ते एक अद्भुत माणूस आहेत आणि माझे मित्र आहेत.

लवकरच चांगला करार होणार : डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. मात्र आता दोन्ही देशांमधील कराराच्या चर्चेला वेग आला आहे. आता ट्रम्प यांनी 'दोन्ही देशांमध्ये लवकरच एक उत्तम व्यापार करार होणार आहे' अशी माहिती दिली आहे.

कराराची चर्चा अंतिम टप्प्यात : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविल्यापासून दोन्ही देश अनेक वेळा कराराच्या जवळ पोहोचले आहेत. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर या व्यापार कराराचा पाठपुरावा करत आहेत.

परराष्ट्र मंत्री संपर्कात : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा केली. व्यापार, महत्त्वाची खनिजे, अणुऊर्जा आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली.

द्विपक्षीय व्यापार : भारत आणि अमेरिकेने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्यापारातील असंतुलन कमी करण्याच्या प्रयत्नात, भारताने अमेरिकेकडून ऊर्जा आणि संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवण्याचे वचन दिले आहे.